Panvel News : मुंबईत मराठीला दाबण्याचा प्रयत्न सुरूच; पनवेलमध्ये परप्रांतीयची दादागिरी | Video

MNS News : मुंबईत मराठी अमराठीचा वाद कायम असून पनवेलमध्ये एका सोसायटीत पुन्हा एकदा परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळाले.

मुंबईत मराठी अमराठीचा वाद सातत्याने बघायला मिळत आहे. परप्रांतीय अमराठी माणसांकडून मराठी माणसांवर आणि मराठी भाषेवर अन्याय होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार पनवेलमध्ये बघायला मिळाला आहे. पनवेलमधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी बघायला मिळाली आहे. हिरानंदानी सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या मराठ गायकवाड कुटुंबावर सोसायटीच्या अध्यक्ष वसुंधरा शर्मा दबाव टाकत होत्या. दुसरं घर मिळेपर्यंत गायकवाड कुटुंबाला घरमालकाने राहायची परवानगी दिलेली असतानाही वसुंधरा शर्मा यांच्याकडून घर खाली करण्याबद्दल दबाव आणला जात आहे. या प्रकारानंतर गायकवाड कुटुंबाने मनसेकडे तक्रार केली. प्रकरणाची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी वसुंधरा शर्मा यांना गायकवाड कुटुंबाची माफी मागायला लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com