Pahalgam Attack : पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठा पुरावा, पहलगाम हल्ल्यामागे लश्करचा टॉप कमांडर फारूख, तो सध्या लपलाय कुठे?

Pahalgam Attack Mastermind Farooq : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा पुरावा हाती लागला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर फारूख हा या हल्ल्यामागे असल्याचं समोर आलं आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आलीय. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर येतंय. फारुख अहमद PoK मध्ये लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अहमद हा लश्करचा टॉप कमांडर आहे.

पहलगाम हल्ल्यामागे लश्कर ए तोयबाचा कमांडर फारूख अहमद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. लश्करचा कमांडर असलेला याच फारूख अहमदचं जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात घर होतं. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईत या फारूखचं घर उद्ध्वस्त केलं होतं.

फारूख अहमद हा सध्या पीओकेमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याने तयार केलेल्या स्लीपर सेलच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून त्याने काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत, अशीही माहिती समोर येत आहे. त्यात पहलगाम येथील हल्ला देखील आहे. या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एक स्थानिक काश्मिरी तरूणाचा मृत्यू झाला आहे. या दोन वर्षांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com