ना मतदान, ना निकाल, त्याआधीच भाजपचे ६ नगरसेवक विजयी; २४ तासांत काय राजकारण घडलं? VIDEO

BJP Wins 6 Corporator Seats Unopposed Before Voting: महापालिका निवडणुकीच्या गदारोळात भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद, संताप आणि आंदोलन पाहायला मिळाले. मात्र अवघ्या 24 तासांत भाजपचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 30 डिसेंबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी विशेष म्हणजे भाजपमध्ये जो राडा झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला. कुठे एबी फॉर्मसाठी सिनेस्टाईल पाठलाग तर काही ठिकाणी अक्षरशः टाहो फोडत आपला संताप व्यक्त केला आणि आत्मदहनाचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला.

मात्र या घटनांना 24 तासही उलटले नसताना आज भाजपचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रेखा चौधरी,आसावरी नवरे आणि रंजना पेणकर तर पनवेलमध्ये नितीन पाटील यांनी विजयाचा गुलाल लावला आहे.

तसेच धुळे येथील मनहापालिका निवडणुकीत देखील भाजपचे दोन उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याने पक्षाच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग क्रमांक 6 ब मधून जोत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com