Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

Funeral Travel Challenges In Tribal Villages: नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी पाड्यावर अद्यापही रस्त्याचा अभाव आहे. अंत्यसंस्कार, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.

नंदुरबार: देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होण्यात येत आहे. तरी देखील नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडाच्या दुर्गम भागात आजही रस्ते नसल्यामुळे इथल्या नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. गंगापूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या केलखाडी पाड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे इथल्या नागरिकांना आपल्या घरातून दळणवळणासाठी, आरोग्याच्या समस्यांसाठी आणि इतर महत्त्वाच्या काम करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

केलखाडी पाडात जवळपास 800 लोक वस्ती आहे. या वस्तीच्या नागरिकांकडून प्रशासनाला वारंवार सांगून देखील रस्ता तयार झालेला नाहीये. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाला आहे. परंतु आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार आणि देशातल्या सुविधा कधी मिळणार असा प्रश्न इथल्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने यांची दखल घेऊन तातडीने केलखाडी पड्याला जोडणारा रस्ता तयार करण्यात यावा अशीच मागणी इथल्या नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com