Nitesh Rane: आतंकवाद आणि जिहादचा रंग एकच तो म्हणजे हिरवा, नितेश राणे संतापले|VIDEO

Why the Silence of Secular Voices? मंत्री नितेश राणे यांनी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यावरून तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पर्यटकांना धर्म विचारला आणि हिंदू धर्म सांगताच गोळ्यांची फायरिंग सुरू केली. यावर मंत्री नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नेहमी सांगितले जाते आतंकवाद्याला कुठला रंग नसतो आता मात्र सिद्ध झाले आहे की आतंकवाद आणि जिहादचा एकच रंग आहे तो म्हणजे हिरवा. सेक्युलरच्या नावाने जे रोज बोलता आता ते कोणत्या बिळात जाऊन बसले आहे? असा घणघाती प्रश्न राणे यांनी विचारत संताप व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, आता त्या हिरव्या सापांना ठेचलेच पाहिजे. गोळी मारण्याअगोदर माता भगिनींच्या डोक्यावर सिंधुर आहे का नाही ते बघितले मग मारले. धर्म विचारून जर गोळी मारली जात असेल तर धर्म विचारून व्यवहार केला तर काय चुकीचे आहे असा सवालही त्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com