Video : अक्षयच्या कुटुंबाला आणि वकिलांच्या जीवाला धोका? नवा खुलासा

Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलांना आणि अक्षय शिंदेच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याने त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलांना आणि अक्षय शिंदेच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याने त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदेचे चुलत काका अमर शिंदे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना अक्षयच्या वकिलांच्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं म्हंटल आहे.

बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं पोलिसांनी मंगळवारी एन्काऊंटर केलं. त्यानंतर आता अद्यापही अक्षयवर अंतिमसंस्कार व्हायचे बाकी आहेत. त्याच्यावर बदलापूरात अत्यसंस्कार करण्यात येऊ नये अशी मागणी बदलापूर येथील नागरिकांनी केल्या नंतर आता पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागी अक्षयचा अंत्यविधी पार पडणार आहेत. गुरुवारी या संदर्भात आरोपी अक्षयचे काका कोर्टात आल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अक्षयच्या कुटुंबाला आणि वकिलांना जीवाला धोका आहे, त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावं. अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील मेल केला असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com