पुण्यात पुन्हा वाद पेटला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर शाईफेक, कारण काय?

Vikas Lavande latest news : शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीत शाईफेक करण्यात आली. वारकरी आणि कीर्तनकारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद पेटला असून पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे.

Vikas Lavande Ink Thrown news : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हभप संग्राम भंडारी यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली. याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यानंतर पुण्यात पुन्हा नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकऱ्यांमध्ये मनुवादी घुसल्याचा, घुसखोर असल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कीर्तनकारांवर आरोप केले होते. त्यानंतर आज आळंदीत सकाळी लवंडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

हभप संग्राम भंडारी यांच्या कृत्याचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी समर्थन केलंय. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी हभप भंडारी यांचे अभिनंदन केले आहे. या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगतं? हे देखील लोकांसमोर यायला हवं असं आमदार जगताप यांनी म्हंटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com