गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला ५ लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून घोषणा|VIDEO

NCP Announces Reward Against Gopichand Padalkarराष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.

गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचं रोख बक्षीस देऊ अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केलीय. आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने बदलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यामुळे राज्यभरात याचे पडसाद उमटले आहेत.

बदलापुरातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. इतकच नाही नाही तर पडळकर यांची जीभ जो कोणी छाटेल त्याला पाच लाखांचं रोख पारितोषिक दिलं जाईल अशी घोषणा यावेळी अविनाश देशमुख यांनी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com