Beed : सत्तेचा मलिदा मिळाल्यावर लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार; शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे यांचा आरोप

Beed News : सरकारने लाडक्या बहिणींना फसवलं आहे, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, यासाठी गळ्यात बाजरीच्या कंसांची माळ घालून राष्ट्रवादीच्या हेमा पिंपळे यांच आंदोलन पोलिसांनी घेतले ताब्यात
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: राज्यातील २६ लाख लाडक्या बहिणींना भाऊ असल्याचा विश्वास देऊन मते मिळवली. नंतर सत्तेचा मलिदा खाल्ल्यावर याच लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार झाला; असा आरोप बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) ऍड. हेमा पिंपळे या आंदोलकाने केला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. गळ्यात बाजरीच्या कंसाची माळ घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऍड. हेमा पिंपळे यांनी अनोखं आंदोलन केले असून पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पक्षाकडून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Beed News
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला लाल रंग लावला, शिवसैनिक आक्रमक, दादरमध्ये तणाव वाढला

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

राज्यात सर्वदूर मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. राज्यातील हि सर्व परिस्थिती पाहता राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.

Beed News
Nashik Crime : शेअर मार्केटमध्ये तोटा; दोघा मित्रांनी निवडला चोरीचा मार्ग, दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

शासनाची केवळ घोषणाबाजी 
बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, जनसुरक्षा कायदा लादून लोकशाही दडपून टाकण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासन करत असल्याचा निषेधही या महिलांनी व्यक्त केला. शासनाने लोकांचा विश्वासघात केला असून, शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आहे. ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत देणे गरजेचे असताना, शासन केवळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com