मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला लाल रंग लावला, शिवसैनिक आक्रमक, दादरमध्ये तणाव वाढला

Meenatai Thackeray Memorial : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Shivaji Park Meenatai Thackeray Memorial news latest updates
Shivaji Park Meenatai Thackeray Memorial news latest updates
Published On
Summary
  • दादर शिवाजी पार्क येथे मीनाताई ठाकरे यांच्या लाल रंग फेकला.

  • या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

  • अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

  • संतापलेल्या शिवसैनिकांनी कठोर कारवाईची मागणी केली.

Shivaji Park Meenatai Thackeray Memorial news latest updates : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर दादर आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे. स्थानिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल रंग कुणी फेकला, त्या अज्ञातांचा शोध पोलिसांकडून करण्यात आला आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हे नालायक लोकांनी हे काम केलेय. मा साहेंबाचं स्थान प्रत्येकाच्या मनात कायम राहणार आहे. नालायक लोकांनी रंग फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दादरमध्ये शिवसैनिक जमायला सुरूवात झाली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैणात कऱण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसैनक संतप्त झाला आहे. पोलिसांकडून जमावाला शांत करण्यात येतेय.

Shivaji Park Meenatai Thackeray Memorial news latest updates
Kunbi Certificates : आधी कुणबी प्रमाणपत्र दिलं, नंतर फडणवीस सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान, वाचा सविस्तर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांचा पुतळा दादरमधील शिवाजी पार्कच्या एन्ट्री गेटच्या मध्यभागी आहे. मीनाताई यांना माँसाहेब म्हणूनही संबोधलं जातं. 1995 मध्ये मीनाताईंचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पवित्र स्मृतींमध्ये या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही याच परिसरात आहे. आज पहाटे अज्ञात व्यक्तीने मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचं समोर आले. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे. शिवसैनिकांकडून पुतळ्यावरील लाल रंग काढण्यात आला आहे. दादरमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Shivaji Park Meenatai Thackeray Memorial news latest updates
Pune : मावळात राजकीय उलथापालथ, राष्ट्रवादीतील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, अजित पवार गटाने पुन्हा बांधली वज्रमुठ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com