Kunbi Certificates : आधी कुणबी प्रमाणपत्र दिलं, नंतर फडणवीस सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान, वाचा सविस्तर
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मराठा समाजाने आजचा दिवस दिवाळीसारखा असल्याचे मत व्यक्त केले.
बंजारा समाजाच्या आरक्षणावरही झिरवळ यांनी कायदेशीर तपासणी आवश्यक असल्याचे म्हटले.
Kunbi certificate distribution in Marathwada by Maharashtra government : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत फडणवीस सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे. बीड, धाराशीव, लातूर, संभाजीनगरसह हिंगोली, परभणीमध्ये आज मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी धक्कादायक विधान केलेय. सरकारने दिलेले हे प्रमाणपत्र न्यायालयात टिकेल की नाही, याबाबत झिरवळ यांनी संशय व्यक्त केलाय. त्यांच्या या विधानाची चर्चा होतेय.
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मराठा बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं. मात्र सरकारने सरकारच्या वतीने दिलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार की नाही, याबद्दल मंत्री झिरवाळ यांनी मात्र साशंकता व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला, यावरही झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यायचे किंवा नाही हे कायदा ठरवेल. कारण संविधानात आणि हैदराबाद गॅझेट मध्ये काय आहे, हे तपासावे लागेल. आदिवासी समाज संविधानात असून प्रत्येक समाजाने शांततेने आंदोलन करायला पाहिजेत, असे देखील म्हणाले आहेत.
कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळालं हा दिवस आमच्यासाठी दिवाळीच
हिंगोलीत मराठा बांधवांना कुणबी जातीचे दाखले वाटप करण्यात आले आहे. हिंगोलीचे पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हे दाखले देण्यात आले आहेत दरम्यान दाखले मिळाल्यानंतर मराठा बांधवांनी आजचा दिवस दिवाळी सणासारखा असल्याची भावना व्यक्त केली. तर या दाखल्याचा संपूर्ण श्रेय मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांना देताना मराठा बांधव भावनिक झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.