Kirti Chakra : अकोल्याच्या वीरपुत्राला मरणोत्तर 'कीर्ति चक्र'; आईचा टाहो पाहून पंतप्रधान मोदीही स्तब्ध | Video

अकोल्याचे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ति चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील पुरस्कार स्वीकारताना वीरमातेचा टाहो पाहून संपूर्ण सभागृह भावूक झाले. पंतप्रधान मोदींसह उपस्थितांचे डोळे पाणावले.

Praveen Janjal Kirti Chakra : मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर सुपुत्र शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना शहीद जंजाळ यांच्या वीरमाता आणि वीरपत्नीला आपल्या भावना अनावर झाल्या. मुलाचा पराक्रम ऐकून भारावलेल्या वीर मातेच्या अश्रूंचा बांध फुटला. राष्ट्रपतींच्या हातून पुरस्कार स्वीकारतानाही त्यांना अश्रू आवरले नाहीत. वीरमातेचा आक्रोश पाहून राष्ट्रपती मुर्मूंनी त्यांचं सांत्वन केलं. यावेळी पंतप्रधान मोदींसह संरक्षणमंत्रीही भावूक झाले होते. संपूर्ण सभागृह सुन्न झालं आणि उपस्थितांचे डोळेही पाणावले.

जम्मू-काश्मीरच्या बर्फाच्छादित दऱ्याखोऱ्यात भारतमातेच्या रक्षणासाठी झुंज देताना अकोल्याचे सुपूत्र, प्रवीण प्रभाकर जंजाळ (रा. मोरगाव भाकरे, ता. अकोला) यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या अद्वितीय शौर्य व पराक्रमासाठी भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘कीर्तिचक्र’ या सर्वोच्च शौर्यचिन्हाने गौरविले आहे. त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. राष्ट्रपती भवनातील हा भावुक क्षण देशवासियांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com