Nashik News: मोकाट कुत्र्यांचा हैदोस, ठाकरेसेनेने थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सोडले कुत्रे; पाहा VIDEO

Nashik Politics: नाशिकच्या निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. मोकाट कुत्र्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कुत्रे सोडले.

नाशिकच्या निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. या कुत्र्यांनी अनेक लहान मुलं आणि नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी केले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष जात असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, नगरसेविका रूपाली रंधवे यांनी नागरिकांना सोबत घेत चक्क मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलावर मोकाट कुत्रे सोडून आपला संताप व्यक्त केला. एकीकडे मोकाट कुत्रे हैदोस घालत असताना मुख्याधिकारी मात्र फक्त निविदा प्रक्रिया पाहण्यात व्यस्त असल्याचा आरोप करीत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक निषेध केला. यावेळी रंधवे दाम्पत्यांनी मुख्याधिकारी आणि प्रशासनाला मोकाट कुत्र्यांबाबत प्रश्नाची सरबत्ती करून धारेवर धरल्याने काही तणाव निर्माण झाला होता. सध्या गणेशोत्सव , नवरात्र आणि सणासुदीचा काळ असल्याने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com