Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

havali Waterfall Assault New Video: नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या भावली धबधब्यावर गेल्या पर्टकांना टवाळखोरांनी मारहाण केली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

नाशिकच्या भावली धबधबा परिसरातील पर्यटकांना मारहाण प्रकरणाचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक हल्लेखोर पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला करताना दिसत आहे. पुढे जाऊन तो धावत्या गाडीवरून थेट महामार्गावर कोसळलाय. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

रविवारी भावली धबधबा परिसरात आलेल्या कुटुंबावर अज्ञात सहा ते सात जणांनी जीवघेणा हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी महिलेचा विनयभंग केला होता. तिच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. हे कुटुंब जेव्हा आपला बचाव करत नाशिच्या दिशेने निघाले तेव्हा आरोपींनी त्यांचा १५ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणाचा तपास अंबड पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com