Thane Tourism : ठाण्याच्या जंगलात लपलाय सुंदर धबधबा, सौंदर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात वीकेंडला तुम्ही मुंबईजवळ फॅमिली ट्रिप प्लान करायची असेल तर येऊर धबधबा बेस्ट ऑप्शन आहे. हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील बेस्ट आहे.

rainy season | pinterest

मुंबई -ठाणे

येऊर धबधबा हा मुंबईपासून साधारण ३५-४० किमी अंतरावर, ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वसलेला आहे. हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Mumbai - Thane | google

येऊर धबधबा

येऊर धबधब्याला गेल्यावर तुम्हाला पक्षीनिरीक्षण, रंगीबेरंगी कीटक आणि वनस्पती पाहायला मिळतील. तसेच तुम्ही राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर सायकलिंगचा आनंद घेता येतो.

waterfall | google

कसं जाल?

येऊर धबधब्याला जाण्यासाठी ठाणे स्थानकापर्यंत लोकल ट्रेनने येऊ शकता आणि त्यानंतर रिक्षाने तुम्ही येऊर धबधब्याजवळ पोहचाल.

how do you go | google

ट्रेकिंगचा आनंद

तुम्हाला जर पहिल्यांदा ट्रेकिंगचा प्लान करायचा असेल तर येऊर धबधबा उत्तम ऑप्शन आहे. पावसाळ्यातील दाट हिरवळ आणि समृद्ध जैवविविधता येथे पाहायला मिळते.

trekking | pinterest

येऊर हिल स्टेशन

येऊर हिल स्टेशनमध्ये येऊर धबधबा आहे. येथे धुक्याची चादर पाहायला मिळते. तसेच पावसाळ्यात इंद्रधनुष्य खुलते.

Yeur hill station | google

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर कान्हेरी लेणी आवर्जून पाहा. येथे वास्तुकलेचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. बोरवली स्टेशनपासून हे ठिकाण जवळ आहे.

Sanjay Gandhi National Park | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Sindhudurg Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...