Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

तारकर्ली बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मालवण शहरापासून सुमारे २२ किमी अंतरावर वसलेला आहे.पांढरी शुभ्र वाळू आणि स्कूबा डायव्हिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Sindhudurg | google

तारकर्ली बीच

तारकर्ली बीचजवळ देवबाग बीच, सिंधुदुर्ग किल्ला आणि सुनामी बेट ही सुंदर पर्यटन स्थळे आहेत. पावसाळ्यात याचे सौंदर्य खूपच खुलते.

Tarkarli Beach | google

स्कूबा डायव्हिंग

तारकर्ली बीचमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Scuba diving | google

कसं जाल?

तारकर्ली बीचच्या जवळ कुडाळ रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही मुंबईहून कुडाळपर्यंत ट्रेनने प्रवास करा, पुढे रिक्षाने तुम्ही तारकर्ली बीचपर्यंत पोहचाल.

how do you go | google

बोटिंगचा आनंद

तारकर्ली समुद्रकिनारा बोटिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे बोटिंग, बॅकवॉटर सफारी, डॉल्फिन दर्शन आणि सनसेट क्रूझचा आनंद घेता येतो.

boating | google

मालवणी खाद्यसंस्कृती

तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर तेथील मालवणी खाद्यसंस्कृतीचा आवर्जून आस्वाद घ्या. येथे नारळाचा वापर करून बनवलेली पारंपरिक कोकणी कढी आणि ताजे सी-फूड खायला मिळते.

Malvani food culture | google

सिंधुदुर्ग किल्ला

जवळच्या मालवण जेटीवरून फेरीद्वारे तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ शकता. १७ व्या शतकातील हा सागरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता.

Sindhudurg Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

Khopoli Hill Station | AI PHOTO
येथे क्लिक करा...