Shreya Maskar
खोपोलीजवळ अंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 'दुरशेत हिल स्टेशन' वसलेले आहे. पावसाळ्यात येथे सुंदर नजारा पाहायला मिळतो.
दुरशेत हिल स्टेशन हे मुंबईपासून सुमारे ७६ किमी अंतरावर वसलेले आहे. येथे ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. दुरशेत हिल स्टेशनजवळ सुधागड व सरसगड हे किल्ले आहेत.
दुरशेतजवळ अष्टविनायक यात्रेतील महत्त्वाचे मानले जाणारे पाली गणपती (श्री बल्लाळेश्वर मंदिर) आणि महाड गणपती (श्री वरद विनायक मंदिर ) ही ऐतिहासिक मंदिरे आहेत.
पावसाळ्यात दुरशेत येथे धबधबे वाहताना दिसतात. तसेच येथे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
पावसाळ्यातील सुरक्षिततेचा विचार करून रॅपलिंग, बर्मा ब्रिज, फ्लाइंग फॉक्स आणि रॉक क्लाइंबिंग यांसारखे साहसी खेळ उपलब्ध करून दिले जातात.
दुरशेतजवळ कोलाडमध्ये कुंडलिका नदीवर 'व्हाइट-वॉटर राफ्टिंग'चा आनंद घेता येतो. तसेच येथे विविध पक्षी पाहायला मिळतात. दुरशेत रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. येथे झिप-लाइनिंगचा आनंद घेता येतो.
हिवाळ्यात आणि पावसाळी वातावरणात नैसर्गिक, गंधकयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांचा आनंद घेण्याची ही एक अनोखी संधी आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.