Vidhan Parishad Election : नाशिक विधानपरिषदेत मोठा ट्विस्ट; भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच, अचानक भाजपच्या गणेश गीतेंचा अर्ज दाखल

ganesh gite files nomination for nashik legislative council seat : नाशिक विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. भाजपचे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच जागेवरून भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिक विधानपरिषदेवरुन भाजप- शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु असताना आता नवा ट्विस्ट आला आहे. गणेश गीते यांनी भाजपकडून या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गणेश गीते भाजपचे माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेच्या जागेचा शब्द दिल्याची माहिती गीतेंनी दिलीय.

काय म्हणाले गणेश गीते?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश महाजन यांची आणि माझी चर्चा झाली होती. या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा त्यांनी मला शब्द दिला होता. त्यामुळे मी आज या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे, असे गीते यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com