नाशिकमध्ये मध्यरात्री तोडली शेकडो झाडे, पाहा व्हिडिओ

Nashik Gangapur Road Hundreds Of Trees Cut Overnight: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी रातोरात शेकडो झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिझेल कटरच्या साहाय्याने झाडे तोडतानाचा प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी रातोरात शेकडो झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये असलेली ही झाडे डिझेल कटरच्या साहाय्याने तोडण्यात आली. विशेष म्हणजे, झाडे तोडतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी गंगापूर रोड परिसरातील रस्त्याच्या डिव्हायडरमधील झाडे कापली. अचानक झालेल्या या वृक्षतोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पर्यावरणप्रेमींकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची गंभीर दखल नाशिक महापालिका प्रशासनाने घेतली आहे. महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या वृक्षतोडीमागे नेमका कुणाचा हात आहे, असा सवाल नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वृक्षतोड करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे झाडे तोडणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com