नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, गोदावरी नदीची पाणीपातळी अजूनही धोका पातळीच्या वरच वाहात आहे. या पुराचा सर्वाधिक फटका चांदोरी आणि सायखेडा या गावांना बसला असून, तिथे गोदावरीचे पाणी शिरल्याने संपूर्ण गावाला सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरातील शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर भागात काही प्रमुख रस्त्यांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने खबरदारी म्हणून ते रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आजदेखील नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा (अलर्ट) कायम असून, पूरपरिस्थितीवर प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात अजूनपर्यंत एकही पॅनिक कॉल आलेला नसून, नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.