Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांचं मंत्रिपद धोक्यात, आठवडाभरात त्याचं मंत्रिपद जाणार?

Minister Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री नरहळी झिरवाळ यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. आठवडाभरात नरहरी झिरवाळ यांचे मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीयासोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. झिरवळांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झालेली आहे अशी माहिती सुत्रांकडून आली आहे. सरकारचे मंत्री, आमदार, कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.

नरहरी झिरवाळ आणि तृतीयपंथी पवन यादव यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सात महिन्यांपूर्वीचा आहे. त्यांचा हा व्हिडीओ नाशिकच्या शासकीय निवासस्थानातील होता. या व्हिडीओने पुन्हा राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून नरहरी झिरवाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. केली जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com