अनैतिक संबंधांच्या संशयातून जमावाचा धुमाकूळ; घर-दुकान फोडून दुचाकी जाळली|VIDEO

Mob Attacks House And Shop In Nandurbar Over Harassment Suspicion: नंदुरबारच्या पटेलवाडी परिसरात छेडछाडीच्या आणि अनैतिक संबंधांच्या संशयावरून 10 ते 12 जणांच्या जमावाने घर आणि दुकानावर हल्ला केला. तोडफोड करून घरासमोरील दुचाकीही जाळण्यात आली. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात महिलेच्या छेडछाडीच्या आणि अनैतिक संबंधांच्या संशयावरून 10 ते 12 जणांच्या जमावाने एका घरावर भीषण हल्ला केला. अज्ञात हल्लेखोरांनी एका इसमाचा घराची आणि दुकानाची तोडफोड करत घरासमोरील दुचाकी जाळून टाकली. या घटनेने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com