Saam TV Exit Poll: काँग्रेस की भाजप, नागपूरात पदवीधरचा आमदार कोण? पाहा साम टीव्हीचा Exit Poll

Nagpur Graduate Constituency Exit Poll: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि अपक्ष नितेश कराळे यांच्यात तिरंगी लढत झाली आहे.

राज्यात आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पार पडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून सुधाकर कोहळे, काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी, तर अपक्ष म्हणून नितेश कराळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचे पारडे जड दिसत आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपमधील काही नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढाकार घ्यावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत CM देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com