Nilesh Lanke: दूध,कांदा दरवाढीसाठी मविआचं आंदोलन; लंकेंचे कार्यकर्ते आणि पोलिस भिडले!

MVA News: महाविकास आघाडीकडून दूध,कांदा दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे.

अहमदनगरमध्ये (Ahmednagar) मविआकडून (MVA) दूध,कांदा दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं.हे आंदोलन अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्तवात पार पडले.दरम्यान या आंदोलनावेळी निलेश लंकेंचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला आहे. जनावरांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची निलेश लंकेंची (Nilesh Lanke) मागणी होती, परंतु पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बॅरिगेट्स लावले आहेत.त्यामुळे पोलिस आणि लंकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com