कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी ते मुंबई हे अंतर आता फक्त चार तासांत पार होणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेला हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग हा कोकणासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे.
३७६ किमी लांबीचा आणि १०० मीटर रुंदीचा हा महामार्ग ६ मार्गिकांसह तयार होणार आहे. यासाठी ६८,७२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुमारे ३७९२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील ४१ बोगदे, ५१ मोठे पूल आणि ६८ ओव्हरपास, जे कोकणातील निसर्गसंपन्न आणि डोंगराळ भागातून सहज मार्गक्रमणास मदत करतील.
महामार्गाची प्रस्तावित मार्गरेषा अशी असेल:
अलिबाग-शहाबाद-रोहा, माणगाव-मेढेगाव, मंडणगड-दापोली-गुहागर-गणपतीपुळे, राजापूर-भालवली-देवगड, मालवण-कुडाळ-सावंतवाडी या प्रमुख कोकणी शहरांना जोडणारा हा महामार्ग कोकणच्या विकासाला गती देणारा ठरेल.
याशिवाय, सागरी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि ग्रीनफिल्ड महामार्ग हे एकमेकांना जोडले जाणार असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. हा महामार्ग कोकणच्या आर्थिक, पर्यटन आणि सामाजिक विकासाला नवे वळण देणारा ठरेल, यात शंका नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.