Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, ५-६ किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा; VIDEO

Traffic Congestion on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कोंडीमागचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर पुणे लेनवर आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. अमृतांजन ब्रिजपासून अडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या तब्बल ५ ते ६ किलमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची भावना आहे.

अनेकांना वेळेवर ठराविक ठिकणी पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कोंडीमागचं नेमकं कारण अधिकृतरित्या समोर आलं नसल्यामुळे, नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com