मुंबईनंतर आता पुणे महानगरपालिकेलाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला आहे. या मेलमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने महापालिकेत दाखल झाले आहे.
दरम्यान, या धमकीच्या मेलमध्ये बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह राजस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीकडून हा मेल पाठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.