म्हाडाचा मोठा निर्णय; मुंबईतील १२२१ घरांच्या किमतीत केली इतकी कपात

mumbai mhada house price : मुंबई म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील १२२१ घरांच्या किमतीत मोठी कपात केली आहे.

संजय गडदे, साम टीव्ही

म्हाडा मंडळाने २०२६ च्या घरसोडतीत नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ घरांच्या किमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आलीये. म्हाडाने मुंबईतील विविध प्रकल्पांमधील एकूण २६४० घरांसाठी संगणकीय सोडत जाहीर केलीये. त्यामध्ये विक्रोळीतील या प्रकल्पाचा समावेश आहे.

कोणत्या घरांची किंमती केली कपात?

संकेत क्रमांक ५३८ अंतर्गत बिल्डिंग क्रमांक २ अ आणि ब मधील ४८० घरांची जुनी किंमत १ कोटी ४५ लाख ५८ हजार ते १ कोटी ४७ लाख ९७ हजार रुपये होती. आता ती कमी होऊन १ कोटी ३४ लाख ६६ हजार ते १ कोटी ३६ लाख ८८ हजार रुपये झाली आहे.

तर संकेत क्रमांक ५३९ अंतर्गत बिल्डिंग क्रमांक ३ अ, ब, क मधील ७४१ घरांची जुनी किंमत १ कोटी ४५ लाख ७४ हजार ते १ कोटी ४८ लाख १४ हजार रुपये होती. आता ती कमी होऊन १ कोटी ३४ लाख ८१ हजार ते १ कोटी ३७ लाख ३ हजार रुपये झाली आहे.

mhada house price
म्हाडाला मोठा दिलासा! घरे विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत इतक्या कोटींचा महसूल जमा

सर्व घरांसोबत प्रत्येकी एक पार्किंग मोफत दिले जाणार आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. तर संगणकीय सोडत ५ जून रोजी काढण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडा मुंबई मंडळाने केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com