लाऊडस्पीकरसाठी आता 1 लाखांचा डिपॉझिट! मुंबई हायकोर्टाचे कडक निर्देश|VIDEO

Mumbai High Court New Loudspeaker Rules For Public Events: मुंबई हायकोर्टाने लाऊडस्पीकर आणि साऊंड सिस्टिमच्या वापराबाबत कडक निर्देश दिले आहेत. सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक लाख, तर वैयक्तिक परवानगीसाठी 50 हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.

मुंबई हायकोर्टाने ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर महत्वाचे निर्देश दिले आहेत सण - उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी साऊंड सिस्टिम वापरण्याची परवानगी घेताना मंडळांना एक लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.

वैयक्तिक पातळीवर एखाद्या व्यक्तीने साऊंड सिस्टिमसाठी परवानगी मागितल्यास 50 हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. परवानगी देताना आवाजाची मर्यादा आणि इतर अटी शर्ती स्पष्ट करण्यात येणार आहेत.

या नियमांचे उल्लंघन करून ध्वनीमर्यादा ओलांडल्यास जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाऊ शकते. तसेच सबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मिरवणुकांमध्ये ध्वनीमर्यादा ओलांडल्यास उपकरणे आणि वाद्ये जप्त करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com