APMC मार्केट पाण्याखाली; कोट्यवधींचा शेतीमाल धोक्यात|VIDEO

Mumbai APMC Market Waterlogging Due To Heavy Rain: मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा शेतीमाल धोक्यात आला असून व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.

मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केटमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्केटच्या आवारात अक्षरशः पाणीच पाणी झाल्याने व्यापारी आणि खरेदीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सततच्या पावसामुळे एपीएमसी मार्केटमधील अनेक गाळे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे बाजारात आणलेला भाजीपाला, फळं आणि इतर शेतीमाल भिजण्याची भीती निर्माण झाली असून कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापाऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाजार समितीच्या निकृष्ट पाणी निचरा व्यवस्थेमुळे दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य नियोजन आणि देखभाल न केल्याने ही समस्या गंभीर होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com