Shruti Vilas Kadam
चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
बडीशेपचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. गॅस, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याचा त्रास कमी करण्यासाठी हा एक फेमस घरगुती उपाय मानला जातो.
जर तुमचे उद्दिष्ट भूक नियंत्रित करून कॅलरीचे सेवन कमी करणे असेल, तर चिया सीड्स अधिक उपयुक्त ठरू शकतात. पचन सुधारायचे असेल तर बडीशेपचे पाणी फायदेशीर ठरते.
एक चमचा चिया सीड्स रात्रभर किंवा किमान ३० मिनिटे पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्यामुळे ते पचायलाही सोपे जाते.
एक चमचा बडीशेप रात्री पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. इच्छेनुसार कोमट पाणीही वापरू शकता.
फक्त चिया सीड्स किंवा बडीशेपचे पाणी पिऊन वजन कमी होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो.
गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा मधुमेह, रक्तदाब अथवा इतर आजार असलेल्या व्यक्तींनी आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.