Andheri Sub Way News: मुंबईतील सब-वे पावसामुळे पाण्याखाली...

संध्याकाळी 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत या भागात पुन्हा मुसळधार पावसाची नोंद झाल्यामुळे अंधेरी सबवे पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Mumbai News: मुंबईत काल रात्रीपासून जबरदस्त पाऊस पडतोय. मुसळधार पावसाने नागरिक त्रस्त झालेत. संध्याकाळी 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत या भागात पुन्हा मुसळधार पावसाची नोंद झाल्यामुळे अंधेरी सबवे पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी येथील वीरा देसाई रोडवर आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी पाणी साचल्याची नोंद झालीये. मध्यरात्री 1 ते सकाळी 8 असा एकूण 7 तासात नोंदविण्यात आलेला उच्चतम पाऊस पुढीलप्रमाणे...१) प्रतीक्षा नगर मनपा शाळा २) सायन - 221 मिमी पावसाची नोंद ३) पवई - 320 मिमी पावसाची नोंद ४) अंधेरी - 298 मिमी ५) शिवडी कोळीवाडा - 186 मिमी ६) चकाला - 283 मिमी ७) चेंबूर - 222 मिमी ८) गोरेगाव - 279 मिमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com