Supriya Sule : एन्काउंटरची चौकशी करा; सुप्रिया सुळेंची मागणी
खासदार सुप्रिया सुळे यांनी अक्षय शिंदे एन्काउंटरनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोपीचे हात बांधलेले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. यावर गृहमंत्री यांनी उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.
बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी सोमवारी रात्री एन्काउंटर केला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षाकडून वेगवेगळे आरोप सरकारवर लावले जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आता याबद्दल सरकारवर निशाणा साधला आहे. ''त्या नराधमाला फाशी व्हावी ही अजूनही माझी इच्छा आहे. पण आरोपीचे हात बांधलेले असताना टो पोलिसांवर कसा हल्ला करतो? आता राज्यातले पोलीसही सुरक्षित नाहीत का? याचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं.'' अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.