Sanjay Raut : 'ते शिवसेनेच्या नावाला कलंक लावतताय'; राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर डागलं जोरदार टीकास्त्र
आम्ही कधी जागावाटपासाठी आणि निर्णय देण्यासाठी दिल्लीत गेलो नाही. स्वतः शिवसेना म्हणून नाव लावून घेऊन असताना दिल्लीमध्ये जाऊन उठाबशा काढतात, हे कधी शिवसेनेने केलं नाही. गेल्या तीन दिवसांपासून हे अमित शहांच्या दरवाज्यात बसले आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लावत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, एक काळ असा होता, गोपीनाथ मुंडे-प्रमोद महाजन यांच्यासारखे नेते चर्चेसाठी मातोश्रीवर येत होते. आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीत तीन-चार दिवस हिरवळीवर बसलेले आहेत, ही लाजिरवाणी बाब. वरळीतून शिंदे गटाने खासदाराला उमेदवारी द्यावी किंवा एकनाथ शिंदे यांनी स्वतः वरळीत उतरावे. तरीही आदित्य ठाकरेच निवडून येणार, एवढीच महत्त्वाची जागा असेल तर थेट जय शहांनाच उभे करावे, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी शिवसेना चोरली आणि मी शिवसेनेचा डुप्लीकेट प्रमुख आहे म्हणतात, त्यांचे हे वागणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही आणि शिवसेनेच्या नावाला कलंक लावण्याचे काम करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कोणत्याही जागेवरून पेच नसल्याचे स्पष्ट केले. एका मतदारसंघात अनेक इच्छुक असु शकतात. वांद्रा येथून वरूण देसाईंचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सुधीर साळवी शिवसेनेपेक्षा वेगळे नाहीत. साळवी हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आमचे सहकारी आहेत. त्या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुखांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असतात. मला वाटत नाही ते रागावले आहेत, इच्छा व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, असंही राऊत यांनी म्हंटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.