Sanjay Raut : हरियाणातील पराभवावर राऊतांचं मोठं विधान; पाहा Video

Hariyana Assembly Results : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल मोठं विधान केलं आहे.

हरियाणाचा पराभव दुर्दैवी आहे. काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकली. हरियाणात इंडिया आघाडी झाली असती, सपा, आप, एखादी जागा शिवसेना, एनसीपीला मिळाली असती, तर याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता, अशी खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. हरियाणातील पराभवानंतर बुधवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही खंत व्यक्त केली.

हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे, त्यातून बरेच काही शिकता आले. कोणी कोणाला मोठा भाऊ छोटा भाऊ समजत नाही लोकसभेतला यश हे इंडिया आघाडीचे यश आहे, काँग्रेस पक्षाला अन्य राज्यातील निवडणुकीसाठी भूमिका घ्यावी लागेल. स्वबळावर लढायचे असेल, तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी, मग अन्य पक्ष आपआपली भूमिका घेतील, असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी हरियाणाचा विजय फार मोठा महान विजय नाही. ठिकठिकाणी अपक्षांनी मत घेतली. जो जिंकतो सिकंदर अशी हिंदीमध्ये म्हण आहे. देवेंद्र फडणवीस हरियाणामध्ये गेले आणि विजय प्राप्त झाला असे काही होत नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com