Raj Thackeray: मनसे यंदा 100 टक्के सत्तेत येणार... राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र|VIDEO

MNS Political Strategy For Municipal Elections: मुंबईतील रंगशारदा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनिती जाहीर केली.

आगामी महापलिकेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसात होणार असून सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला होता. राज्यात केवळ एकच आमदार मनसेचा आमदार होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत या आमदारचा पराभव झाल्याने मनसेला मोठा झटका बसला. मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेसोबतच्या युतीबद्दल मोठे विधान केले आहे. तसेच त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देखील दिला आहे.

राज ठाकरे यांनी आज मुंबई येथील रंगशारदा या ठिकाणी एक पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्याला मुंबईतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान राज ठाकरेनी पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या. मराठी भाषेचा मुद्दा घराघरात पोहोचवा, पण हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असा महत्वपूर्ण सल्ला राज ठाकरेनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com