Raj Thackeray: राज ठाकरेची रायगडाच्या पायथ्यावरून गर्जना, १९ तारखेला करणार मोठी घोषणा

MNS chief Raj Thackeray On Gudi Padwa Melava: मनसेचा गुढीपाडवा मेळवा येत्या १९ तारखेला होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १९ तारखेला शिवतीर्थवर सर्वांनी येण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा २० वा वर्धापन दिन आज आहे. या निमित्ताने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मनसेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी शिवरायांचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी महाराजांच्या आशीर्वादाने सदस्य नोंदणीला सुरूवात केली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, 'दरवर्षी आपण वर्धापन दिन एका हॉलमध्ये साजरा करतो. तिकडे तुम्ही सगळे येता. यावर्षी मी ठरवले की ९ तारखेला वर्धापन दिन आणि १९ तारखेला गुडपाडव्याचा मेळावा. म्हटलं ९ ला पण बोला १९ ला पण बोला. मग ठरवलं जे काही बोलायचे ते १९ लाच बोलून टाकू. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवले की ९ तारखेला काय करावे. पक्ष सदस्य नोंदणी ही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे वर्धापन दिनी आम्ही पक्ष सदस्य नोंदणी सुरू केली. माझे सर्व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे. अनेक लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचेय. नुसते सदस्य नाही व्हायचे तर सक्रीय सदस्य व्हायचं आहे. तर ज्या ज्या वर्दळीच्या जागा असतील शाळा, कॉलेज, मंदिर असतील तिथे आपल्या मनसे सदस्य नोंदणीचा स्टॉल लागला पाहिजे. तुम्ही लोकांना भेटले पाहिजे, बोलले पाहिजे. हजारो लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. त्यांना सदस्य करून घ्या. आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावर आज आपल्या नोंदणीची सुरूवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही राज्यभर जा. १९ तारखेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी यावे. २० वर्षापूर्वी माझी पहिली सभा १९ मार्चला झाली होती. आज २० वर्षानंतर आपल्या गुडपाडव्याच्या सभेला १९ मार्च हीच तारीख यावी हा योगायोग आहे. १९ मार्चला सर्व मनसैकिांनी शिवतीर्थवर यावे', असे आवाहन राज ठाकरे यांनी सर्व मनसे कार्यकर्त्यांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com