Melghat News : मेळघाटात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

Earthquake : चिखलदरा, काटकुंभ, चुरणीमध्ये सोमवारी दुपारनंतर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. चिखलदरा, काटकुंभ, चुरणीमध्ये हे सौम्य धक्के जाणवले आहेत. सोमवारी दुपारनंतर अमरावतीच्या मेळघाट परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात सोमवारी भूकंपाचे धक्के बसले. इथल्या चिखलदरा, काटकुंभ, चुरणी या भागात हे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घराबाहेर येत मोकळ्या जागेत आसरा शोधला. हे धक्के फार तीव्र नसले तरी त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण पासरलं आहे. यात काही नुकसान झालं आहे का? याबद्दल अद्यापही कोणती माहीती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com