BJP News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक

भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवाला सोमोरे जावे लागले होते. झालेलापराभव भरून काढण्यासाठी एकाच दिवशी भाजपच्या ४ बैठका मुंबईत होत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तोच भरुन काढण्यासाठी भाजपचं बैठक सुत्र सुरु झाले आहे. मुंबईत भाजपच्या एकाच दिवशी चार बैठका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या नारजगीचा महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. असा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसु नये यासाठी काय करता येईल यासंदर्भात च्रर्चा करण्यासाठी मराठा समाजाच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. आज मुंबईत होँँणाऱ्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती ठरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com