Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी, VIDEO

Mumbai-Goa Highway Traffic Update : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीसच नसल्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

अमोल कलये, रत्नागिरी | साम टीव्ही

उन्हाळी सुट्ट्यांमुळं मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात निघाले आहेत. त्यात स्थानिकांच्या वाहनांचीही भर पडल्यामुळं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. चिपळूणमध्ये बहादूर शेख नाक्यावर वाहनांची रांग लागली आहे. वाहतूक पोलीस या ठिकाणी कर्तव्यावर नसल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बहादूर शेख नाक्यावर चारही दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहनांची रांग लागते. बेशिस्त वाहन चालकांमुळे महामार्गासह शहरांतर्गत वाहतुकीलाही मोठा फटका बसतो. ही वाहतूक कोंडी सोडवताना स्थानिकांची दमछाक होत आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने बहादूर शेख नाक्यावर वाहतूक कोंडीत अडकली. तर कराडहून चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com