Mumbai Building Fire : मुंबईत ७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग

Mumbai Fire News Update : मुंबई सेंट्रलमधील एका सात मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्याने प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू होते.

संजय गडदे, मुंबई, साम प्रतिनिधी

मुंबईत एका इमारतीला भीषण आग लागली. मुंबई सेंट्रलमधील कैलास अपार्टमेंट्समध्ये ही घटना घडली. सात मजली इमारत असून, तिच्या दुसऱ्या मजल्यावर संध्याकाळच्या सुमारास आग पसरली. अग्निशमन दलाला संध्याकाळी ५.४० वाजता ही माहिती मिळाली. या घटनेची मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, तसेच पालिकेची पथके घटनास्थळी पोहोचली. आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट पसरले होते. ही आग दुसऱ्या मजल्यावर लागली होती. सुदैवाने ती पसरली नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com