Bhiwandi Fire : गॅस लायटर कंपनीला भीषण आग, ३०-३५ बकऱ्या होरपळल्या

Bhiwandi Fire VIDEO : भिवंडीत गॅस लायटर कारखान्याला भीषण आग लागली. यात संपूर्ण कारखाना खाक झाला आहे. तर ३० ते ३५ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

फय्याज शेख, भिवंडी | साम टीव्ही

अंबरनाथमधील एमआयडीसीत कंपनीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच, भिवंडी तालुक्यातही एका कारखान्याला भीषण आग लागली. तालुक्यातील सापे ग्रामपंचायत हद्दीत लायटर तयार करण्याच्या कारखान्याला आग लागली. या आगीच्या घटनेत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला.

कारखान्यात जे लायटर तयार केले जात होते, त्यासाठी लागणारा गॅस असल्यानं सतत स्फोट होत होते. आगीची तीव्रता वाढतच होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी महानगरपालिका, कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे दोन्ही बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. तसेच ३० ते ३५ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com