Markadwadi News : मारकडवाडीतील ईव्हीएम विरुद्ध बॅलेट लढाई टळली; ऐतिहासिक निर्णयाला प्रशासनाचा ब्रेक,VIDEO

Markadwadi Ballot Paper Voting update : राज्यात ईव्हीएम विरोधात संशयाचं वादळ उठलं असताना मारकडवाडीत ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर फेरतमतदानाचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने या निर्णयाला ब्रेक लावलाय.. त्याचं कारण काय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडीत गावकऱ्यांकडून घेण्यात येणारं मतपत्रिकेवरचं फेरमतदान अखेर रद्द करण्यात आलं... ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर फेरमतदानाची संपूर्ण तयारी केली असताना पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने या ऐतिहासिक घटनेला ब्रेक लागला....

माळशिरस या अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात पवारांच्या पक्षाचे उत्तम जानकर विरुद्ध भाजपच्या राम सातपुते यांच्यात थेट लढत झाली होती. या मतदारसंघात उत्तम जानकर यांचा विजय झालाय... मात्र मारकडवाडीतील नागरिक हे उत्तम जानकर यांच्या विचाराचे असतानाही राम सातपुतेंना आघाडी मिळाल्याने मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.

तर या ऐतिहासिक प्रक्रियेसाठी प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र प्रशासनाने ग्रामस्थांना नोटीस पाठवून जमावबंदी लागू केली. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला. मात्र यानिमित्ताने ईव्हीएमच्या निकालाची मतपत्रिकेच्या माध्यमातून करण्यात येणारी प़डताळणी टळल्यानं अनेकांचा हिरमोड झाला एवढं मात्र नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com