रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य असल्याच्या निर्णयानंतर काही संघटनांनी संपाची हाक दिली आहे. यावरून राजकारण तापलं असून, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठीचा आग्रह योग्य आहे; पण वाद नको, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मराठी बोलता येत नसलेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठी शिकवणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो, येथे मराठीचा आग्रह असणे किंवा मराठी भाषेला प्राथमिकता द्यायला हवी यात काही चुकीचं नाही. जे आमच्याकडील रिक्षा-टॅक्सीचालक आहेत, यातील ज्यांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही मराठी शिकवणार. देशात सक्ती वैगेरे करून भाषेच्या नावावर हिंसा करणे स्वीकारार्ह नाही. त्यामुळे आम्ही रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकवू. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.