Maratha Protest: मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाचा अनोखा प्रयोग; आझाद मैदानात आणला ‘बादशाह’ रेडा|VIDEO

Unique Support for Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने आपला रेडा मुंबईच्या आझाद मैदानात आणला.

मराठा आरक्षणाचा लढा हा मुंबईमध्ये शुक्रवारपासून सुरू असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बंधाव हा मुंबईमध्ये दाखल होत असताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एक मराठा बांधव हा रेडा आपल्या सोबत आणत आहे. यावेळी रेडाचे मालक म्हणाले, संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी माझा बादशाह म्हणजे हा रेडा. हा रेडा आणत असताना प्रचंड त्रास हा आम्हाला झाला आहे. आणि सरकारला माणसाची भाषा कळत नाही मात्र मुक्या जनावराची तरी कळेल अशी अपेक्षा या बादशाहच्या मालकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com