Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला मारण्याचं षडयंत्र या सरकारनं रचलंय, असं जरांगे म्हणाले.

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही

Manoj Jarange allegation against Fadnavis government : मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले असतानाच, त्यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकारने मला मारण्यासाठी षडयंत्र रचले आहे, असे ते म्हणाले. साम टीव्हीला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत देताना त्यांनी वरील आरोप केले. मुंबईतील आझाद मैदानावर जाण्यावर ते ठाम आहेत. कोण माझ्यावर गोळ्या झाडतंय ते बघूच, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. मात्र, सरकारच्या शिष्टाईला अद्याप यश आलेले दिसून येत नाही. त्यामुळेच जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सध्या ते काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. या सरकारनं मला मारण्याचं षडयंत्र रचलं आहे, असं ते म्हणाले.

माझ्या समाजाच्या लेकरांपेक्षा मला काय महत्वाचं आहे. समाजाची लेकरं-बाळं सुखी करण्याची आपली जबाबदारी आहे. एक तर मरायचं नाहीतर आरक्षण तरी घ्यायचं, असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलं. सरकारने मला मारण्याचं षडयंत्र रचलं आहे. आझाद मैदानावर मला गोळ्या घालू द्या, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com