मनोज जरांगे आणि सुरेश धस हत्येच्या कटानंतर करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर स्फोटक आरोप|VIDEO

Shocking Twist: Karuna Munde Accuses Dhananjay Munde: मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर करुणा मुंडे म्हणाल्या, जो स्वतःच्या बायकोला संपू शकतो तो कोणालाही संपू शकतो असे वक्तव्य करत करुणा मुंडेंनी खळबळ उडवली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्या वरती करण्यात आलेला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट धनंजय देशमुख, सुरेश धस आणि करुणा मुंडे यांच्या बाबतीतही असाच कट रचण्यात आला होता. यावर करुणा मुंडे यांनी बोलताना म्हटले आहे की जो स्वतःच्या बायकोला संपू शकतो. तो कोणालाही संपू शकतो आणि या अगोदर दादा गरुड हा व्यक्ती माझ्याकडे आला होता. आणि त्यांनी मला कॉल देखील केला होता. आणि बरीच काही माहिती त्यांनी माझ्याजवळ दिली आहे. असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे. करुणा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या पाहा व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com