मंगलप्रभात लोढा घेणार राज ठाकरेंची भेट?

Mangal Prabhat Lodha News Today: भाजप नेते मंगलप्रभात लोढा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये. त्यामुळे या भेटीत दक्षिण मुंबईच्या जागेवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेते मंगलप्रभात लोढा हे शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये. त्यामुळे या भेटीत दक्षिण मुंबईच्या जागेवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगलप्रभात हे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मनसेच्या पाठिंब्यामुळे ही जागा महायुतीसाठी भक्कम होऊ शकते. यासाठी लोढा हे राज ठाकरेंचा पाठिंबा मागण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com