Chandrapur : महावितरणचं कार्यालय की जुगाराचा अड्डा? कर्मचाऱ्यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ 'साम'च्या हाती, Video

Chandrapur Latest News : महावितरणचं कार्यालय की जुगाराचा अड्डा? असा सवाल उपस्थित करणारा व्हिडिओ 'साम'च्या हाती लागली आहे. या व्हिडिओमध्ये लाईनमन थेट उपकार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीत पत्ते खेळत असल्याचं समोर आलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महावितरण कंपनीच्या एका लाईनमनचा अजब कारनामा समोर आला आहे. उपकार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीत बसून हा लाईनमन चक्क जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. या लाईनचा जुगार खेळतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. रवींद्र गंधारे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो प्रधानतंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहे.

जिवती तालुक्यातील अनेक नागरिक उशिरा रात्री देखील विजेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे दिवस रात्र हे कार्यालय उघडे राहते. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लाईनमन आणि तंत्रज्ञ कार्यालयात रात्री उशिरापर्यंत थांबतात. याच गोष्टीचा गंधारे गैरफायदा उचलतात. त्यांनी थेट वरिष्ठांच्या खुर्चीत बसून पत्ता खेळण्याचा प्रकार केला आहे. लोकांच्या तक्रारी टाळण्यासाठी फोन बंद करून पत्ते खेळत असल्याची तक्रार त्याच्याविरोधात आहे. तसेच समस्या निवारण आणि नवीन जोडणीसाठी देखील पैसे मागते. पैसे घेतल्याशिवाय कामच करत नसल्याच्या त्याच्याविरोधात तक्रारी आहेत. या प्रकारानंतर त्याची चौकशी करून त्याचाविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com