Maharashtra Zilla Parishad election results district wise latest updates पुणे, सोलापूरसह महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत एकूण ७,४३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतदानयंत्रात बंद झाले. काही तासांत या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
सोमवारी सकाळी १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे. ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत या निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी किरकोळ तणावात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या निकालातून स्थानिक राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. प्रशासनाने निकालाची तयारी पूर्ण केली असून उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.